Breaking News
ताज्या बातम्या 

शांताबाई...शांताबाई... म्हणत येळीत काढली शाळकरी मुलीची छेड; तीन ताब्यात तिघे फरार

2015-10-08 15:22:03

लातूरः गेल्या काही दिवसापासून लातूर व परिसरात अल्पवयीन मुलींची छेड काढणे, तिच्यावर बलात्कार करणे अशा प्रकारात वाढ झाली असून लातूर जिल्ह्याची ओळख बलात्कार व छेडछाडीचा जिल्हा अशी बनत चालली असताना काल येळी, ता. लातूर येथे एका शाळकरी मुलीस शांताबाई...शांताबाई म्हणून तिची छेड काढून तिचा सतत पाठलाग करण्याचा प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच या प्रकरणी गातेगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या गणेशोत्सव काळामध्ये शांताबाई...शांताबाई या गाण्याने राज्यातील बरेच तरूण चेकाळले आहेत. काल दुपारच्यावेळी येळी येथील चौकामध्ये एक ५० वर्षे वयाची दलीत महिला आपल्या शाळेत जाणा-या अल्पवयी नातीस घेवून जात असताना गावातील काही ठरावीक तरूण...

15 Views Read Full Article
🔀इतर ताज्या बातम्या
संपादकीय

पोलीसांचा जाचजुलूम

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटले जायचे. पण न्यायालयाच्या क्षेत्रात जेवढ्या पाय-या ‘चढाल’ तेवढा अधिक न्याय मिळतो अशी आजची परिस्थित्ी आहे. पण आज समाजामध्ये अडचण निर्माण झाली आहे. ती पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची, अवैध धंदे, मटका, विविध संघटना, पक्षाचे मोजके कार्यकर्ते सोडले तर शहाणा माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास धजत नाही, एवढी लाचखोरी या विभागात वाढली आहे. जिथे एखाद्या पोलीस ठाण्याचा प्रभारीच वर पैसे भरून विशिष्ट पोलीस ठाणे मिळवितो त्या प्रभाीर अधिका-याकडून सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा ती काय असू शकते. शासन पातळीवर एखाद्या क्षेत्रात लाखो कोटी रूपयाची अफरातफर होते. कोट्यावधीची लाच घेतली जाते अशा ठिकाणची लाचखोरीची चर्चा

4 Views Read Full Article

Today's E-paper

Latest Galleries